जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत चाळीसगावातील आ.ब. मुलांचे हायस्कूलचे दोन्ही संघ प्रथम

विजेत्या खेळाडूंची धुळे येथे विभागीय स्पर्धेसाठी निवड


चाळीसगाव (8 ऑक्टोबर 2024) : जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा ग्रेस अकॅडमी येथे पार पडल्या. त्यात आ.बं.मुलांचे हायस्कूलचे 14 वर्ष आतील संघ आणि 17 वर्ष आतील संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या दोन्ही संघाची विभागासाठी धुळे येथे निवड झाली. दोन्ही हॅण्डबॉल खेळाडूंना मार्गदर्शक क्रीडा शिक्षक तसेच चा.ए. सोसायटीच्या मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, आ.बं.मुलांचे हायस्कूलचे चेअरमन योगेश अग्रवाल, अध्यक्ष आर.सी.पाटील, सचिव डॉ.विनोद कोतकर, सीनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, आ.बं.गर्ल हायस्कूलचे चेअरमन अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, समन्वय समितीचे चेअरमन मु.रा.अमृतकार, शाळा समिती सदस्य रवींद्र राजपूत, मुख्याध्यापक शरद जाधव, उपमुख्याध्यापक एम.बी.कुमावत, पर्यवेक्षक प्रशांत नेरकर, सुनीता कासार, कार्यालयीन प्रमुख निरंजन लद्दे आदींनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक कल्पेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !