युएसओ वारकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा.भूपेंद्र बाणाईत


Prof. Bhupendra Banai appointed as Jalgaon District President of USO Warkari Organization भुसावळ (8 ऑक्टोबर 2024) : युएसओ वारकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.भूपेंद्र बाणाईत यांची निवड करण्यात आली.

जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन मंदिर या ठिकाणी म्हणजेच देहुगाव पुणे येथे युएसओ वारकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ह.भ.प.माणिक महाराज मोरे होते. या कार्यशाळेत अनेक वक्त्यांनी वारकरी संप्रदाबद्दलचे आपले मत व्यक्त केले.

युएसओ वारकरी म्हणजे काय? युएसओ वारकरी संघटनेची तत्वे, मूल्य आणि प्रवास या संदर्भात युएसओ वारकरी संघटना ज्यांच्या विचारातून पुढे आली, अशा ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे यांनी सविस्तर माहिती दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय एक झाला पाहिजे त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायाला जागतिक गत वैभव प्राप्त करून देण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने आपण सर्वांनी काम केले पाहिजे, असे प्रतिपादन अनिकेत महाराज यांनी केले. महाराष्ट्रात युएसओ वारकरी व्यापक रचनेच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून फेकरी, ता.भुसावळ येथील प्रा.भूपेंद्र बाणाईत यांची निवड करण्यात आली. श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह.भ.प.गुरुवर्य अनिकेत महाराज मोरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

त्यांच्या या निवडीबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, प्रा.प्रशांत पाटील तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमात भुसावळातील प्रा.कौस्तुभ पाटील, दृश्यन नायदे, कार्तिक जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !