हरियाणात अतिरिक्त पोलिस महासंचालकांची गोळी झाडून आत्महत्या : समोर आले धक्कादायक कारण

Additional Director General of Police shoots himself to death in Haryana नवी दिल्ली (9 ऑक्टोबर 2025) : सेवेतील जातीय भेदभाव, अन्याय आणि मानसिक त्रासाला कंटाळून हरियाणातील वरिष्ठ आयपीएस व अतिरिक्त पोलिस महासंचालक ) पदावर कार्यरत असलेल्या वाय. पूरन कुमार यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती.
निडर अधिकार्याच्या आत्म्हत्येने खळबळ
घटनेच्या एक दिवस आधी पूरन कुमार यांनी रोहतकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतला होता. पूरन कुमार हरियाणा कॅडरमधील 2001 बॅचचे अधिकारी होते. ते त्यांच्या स्पष्टवक्त आणि व्यवस्थेतील अनियमितता उघड करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार जपानच्या दौर्यावर होत्या. त्यांची धाकटी मुलगी जी घरी होती. गोळीचा आवाज ऐकनू मंगळवारी दुपारी उदोन वाजताच्या सुमारास ती बेसमेंट गेली आणि तिचे वडील रक्ताच्या थारोळ्यात सोफ्यावर पडलेले आढळले. तिने ताबडतोब सुरक्षा कर्मचार्यांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईड नोट
आत्महत्येपूर्वी त्यांनी आठ पानी सुसाईड नोट लिहिली असून त्यात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 2001 बॅचचे अधिकारी असलेल्या पूरन कुमार यांनी चंदीगडमधील खासगी निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर घरात आठ पानी सुसाइड नोट मिळाली असून, त्यात त्यांनी संपूर्ण मालमत्ता पत्नीच्या नावावर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आयपीएस व आय.एस.अधिकार्यांवर गंभीर आरोप
पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले की, 8 आयपीएस आणि दोन आ.एस.अधिकार्यांनी त्यांना सातत्याने मानसिक आणि प्रशासकीय दबावाखाली ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये हरियाणाचे माजी डीजीपी यांच्यावर सर्वाधिक गंभीर आरोप केले आहेत.
नोटमध्ये पूरन कुमार यांनी स्पष्टपणे नमूद केले की, त्यांच्याशी जातिवरुन भेदभाव करण्यात आला, पोस्टिंग आणि प्रमोशनमध्ये अन्याय, अॅन्युएल कॉन्फीडेन्शीयल रिपोर्टमध्ये फेरफार, सरकारी निवास नाकारला जाणे आणि त्यांच्या प्रशासकीय तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा उल्लेखकरीत या आरोपांसह आता लढण्याची ताकद उरलेली नसल्याचे नमूद केले आहे.
निर्भय अधिकारी म्हणून पूरन कुमार यांची ओळख
वाय. पूरन कुमार हे हरियाणा कॅडरचे 2001 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते कठोर, प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आयजीपी (रोहतक रेंज), आयजीपी (कायदा आणि सुव्यवस्था), आय.जी.(दूरसंचार विभाग), आय.जी. पोलिस ट्रेनिंग सेंटर या पदांवर काम केले. अलिकडेच सरकारने त्यांना रोहतक रेंजवरुन पीटीसी सुनारिया येथे ट्रान्सफर केले होते. विभागीय वर्तुळात या बदलीला पनिशमेंट पोस्टिंग मानले जाते.
