राज्यात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही खोकल्याचे औषध

खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी : डायइथिलीन ग्लायकोल’ आढळल्यास नष्ट करण्याचे आदेश


Cough medicine will not be available in the state without a doctor’s note. मुंबई (9 ऑक्टोबर 2025) : कफ सिरपमुळे आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू ओढवल्यानंतर सरकारने राज्यात खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी घातली असून केवळ डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीनंतर हे औषध आता मिळणार आहे. मध्य प्रदेश-राजस्थानात कफ सिरप सेवनामुळे 20 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर हाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे.

कोल्ड्रीफ सिरपने घेतले बालकांचे बळी
बाल मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ सिरप’च्या (समूह क्रःएस आर 13) साठ्यावर महाराष्ट्राच्या एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या औषधात ‘डायइथिलीन ग्लायकोल’ हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट असून या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालयात तपासणी सुरू केली आहे.

विषारी कफ सिरपचा साठा आढळल्यास तो गोठवावा आणि त्वरित नष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. राज्यातील अधिकारी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत.

तामिळनाडूत घातक सिरपचा कारखाना सील
मध्य प्रदेशात विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या बुधवारी 20 वर पोहोचली. नागपूरमध्ये दाखल आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला म्हणाले की, नागपुरात अजूनही पाच मुले दाखल आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश एसआयटीने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आणि तामिळनाडूमध्ये छापा टाकला. तपास पथक कांचीपुरम जिल्ह्यातील सुंगुवरचत्रम येथे पोहोचले, जिथे श्रीसम फार्मास्युटिकल्सचा कारखाना आहे. एसआयटी पथकाने कारखाना सील केला. तेलंगणाच्या औषध नियंत्रण प्रशासनाने गुजरातमध्ये उत्पादित रिलीफ व रेस्पिफ्रेश या दोन कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !