मुक्ताईनगर तालुक्यातील युवकाचा खून ; संशयीत ताब्यात


Murder of a youth in Muktainagar taluka ; Suspect in custody मुक्ताईनगर (9 ऑक्टोबर 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा गावातील तरुणाचा जुन्या वादातून खून झाल्याची घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सतीश गजानन झाल्टे (21, रा.पिंप्राळा, ता.मुक्ताईनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे तर आरोपींच्या हल्ल्यात मृताचा मित्र अविनाश जितेंद्र झाल्टे (23) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खान्देश रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय घडले तरुणासोबत
समजलेल्या माहितीनुुसार, मृत सतीश आणि जखमी अविनाश यांचा काही दिवसांपूर्वी मलकापूर येथील काही तरुणांशी धोंगर्डी फाट्यावर वाद झाला. बुधवारी सायंकाळी हे दोन्ही तरुण धोपेश्वर मंदिराजवळ एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना, याच वादातील मलकापूरचे संशयीत तरुण त्या ठिकाणी आले. जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि याचे रुपांतर हाणामारी व चाकू हल्ल्यात झाले.

संतप्त जमावाने आरोपींना चोपले
चाकूहल्ल्यात सतीश झाल्टे गंभीर जखमी झाला त्याला तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी हल्लेखोरांपैकी काहींना पकडून बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मारहाण झालेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये देवा तिलकसिंह राजपूत (24, रा.सावजी फेळ), संकेत सुनील उन्हाळे (21), साहिल सुधाकर पालवे (18) आणि अरविंद अजय साळुंखे (19) यांचा समावेश आहे. या घटनेत आणखी काही युवक सहभागी असल्याचा संशय आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !