प्रा. प्रिती नितीन महाजन यांना डॉक्टरेट


रजळगाव (9 ऑक्टोबर 2025) : डॉ. उल्हास पाटील सायन्स महाविद्यालयात ग्रंथपाल प्रा. प्रिती नितीन महाजन यांना कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सायंटोमेट्रिक अभ्यास या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे.

त्या गंगाधर रामदास पाटील,विमल गंधाधर पाटील मु. पिळोदा ह.जळगाव येथिल शिक्षक दापत्याच्या कन्या असून जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव बँक जळगाव येथील औद्योगिक वसाहन शाखेतील सहायक शाखा व्यवस्थापक नितीन सुखदेव महाजन यांच्या त्या पत्नी आहेत त्यांना एसएसव्हीपीएस कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिंदखेडयाचे डॉ. तुषार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. प्रिती महाजन यांची नियुक्ती स्व. गोदावरी पाटील यांनी केली होती त्यामुळे डॉक्टरेट त्यांना समर्पित केली आहे. संस्थेचे संस्थापक डॉक्टर उल्हास पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांच्या पाठबळामूळेच हे शक्य झाल्याचे सांगत आभार मानले आहे. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हे ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील दुवा साधणारे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, जे माहितीचा ठवापर सुलभ करते आणि लोकांना माहिती मिळवण्यासाठी व समजून घेण्यासाठी मदत करते.त्यांच्या या संशोधनाचा भविष्यात या क्षैत्रातील लोकांना फायदा होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !