रावेर पोलिसांनी 17 लाखांचा गांजा केला जप्त : एका संशयीताला अटक

Raver police seize ganja worth Rs 17 lakhs : One suspect arrested रावेर (9 ऑक्टोबर 2025) : रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन एकरातील 171 किलो वजनाची गांजाची शेती उध्द्वस्त केल्याने गांजा तस्कर प्रचंड हादरले आहे शिवाय गांजा शेती फुलवणार्या एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रावेर तालुक्यातही गांजा शेती फुलवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने आता तस्कर यंत्रणेच्या रडारवर आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचेच पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना 9 रोजी मोरव्हाल, ता.रावेर शिवारातील शेतात आरोपी युसूफ अकबर तडवी (50, रा. मोरव्हाल) याने त्याच्या दोन एकर शेतात तूर पिकात गांजा शेती फुलवल्याची माहिती मिळाली. निरीक्षकांनी सोबत टीमला घेत 9 रोजी छापेमारी केल्यानंतर गांजाचे 171 किलो वजनाची 172 लहान मोठी झाडे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाचे आजच्या बाजार भावानुसार मूल्य 17 लाख रुपये आहे.
दरम्यान, शेत हे अति दुर्गम भागात असल्याने गुन्हे शोध पथकाने जवळपास तीन किलोमीटर परीसर गुरुवारी सकाळी आठ वाजेपासुन पिंजुन काढत मिळालेल्या बातमीची खातरजमा करीत कारवाई केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरी तुषार पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील नाईक कल्पेश आमोदकर, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भूषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील पाल दुरक्षेत्राचे हवालदार ईश्वर चव्हाण, हवालदार जगदीश पाटील, कॉन्स्टेबल ईस्माईल तडवी, कॉन्स्टेबल गजाजन बोणे, कुंदन नागमल चालक हवालदार गोपाळ पाटील आदींच्या पथकाने केली.
