ट्रकने अचानक ब्रेक लावताच एस.टी.बस धडकली : यावलमधील अपघातात 21 प्रवासी जखमी ; तिघांची प्रकृती नाजूक

Truck suddenly brakes and hits ST bus : 21 passengers injured in Yaval accident; Three in critical condition पुणे (10 ऑक्टोबर 2025) : यावल शहरातील बुरूज चौकात समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रकवर मागून एसटी धडकल्याने झालेल्या अपघातात 21 प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात घडला.
काय घडले यावल शहरात ?
शिरागड येथून यावल येथे बस येत असताना बसच्या पुढे चालणार्या ट्रकने अचानक ब्रेक दाबताच एस.टी.बस मागून धडकली. या अपघातामध्ये बसमधील 21 प्रवासी जखमी झाले. जखमींवर तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. तिघांना पुढील उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले आहे. आगाराच्यावतीने जखमींची विचारपूस करून तातडीची आर्थिक मदत करण्यात आली.
शहरातून मार्गस्त होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर बुरूज चौकात चौकात शिरागड ते यावल बस (क्रमांक एम. एच. 20 बी. एल. 1809) घेऊन चालक नुरुद्दीन शेख हे यावल शहरात येत होते. त्यांच्या समोर चालत असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि मागील बसवर चालक शेख यांना नियंत्रण मिळवता आले नाही व ते थेट मागुन ट्रकवर जाऊन धडकले. या अपघातामध्ये 21 प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण दाखल करण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, कादर तडवी, अमोल अडकमोलसह आदींनी उपचार केले. अपघाताची माहिती मिळताच जखमींची विचारपूस व पाहणी करण्यासाठी यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ल, वाहतूक लिपिक संदीप पाटील,वाहतूक नियंत्रक के.डी. चौधरी पथकासह दाखल झाले व त्यानी तातडीने या जखमींना त्यांनी प्रत्येकी 500 रुपये आर्थिक मदत केली. तर या जखमीतील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
