लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच जमा होणार रक्कम : ही तारीख आली समोर !

The amount will be deposited in the bank accounts of beloved sisters before Diwali: This date has come to light! मुंबई (10 ऑक्टोबर 2025) : ही बातमी राज्यातील लाडकी बहिणींसाठी दिलासा देणारी आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर लाडकी बहिण योजनेचे पैसे आजपासून अर्थात 10 ऑक्टोंबरपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात होणार आहे.
सरकारसाठी गेमचेंजर योजना
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत तसेच विविध दावे करत आहेत. असे असले तरी ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही महायुती सरकारकडून दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार 500 रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत असतात. आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी अद्याप जमा झालेला नाही. सप्टेंबरचा निधी कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस 10 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
