धुळे तालुका पोलिसांची कामगिरी : शिरूडमधील इलेक्ट्रीक तार चोरट्यांची टोळी जाळ्यात

Dhule Taluka Police’s performance: Gang of electric wire thieves in Shirud caught धुळे (10 ऑक्टोबर 2025) : धुळे तालुका पोलिसांनी इलेक्ट्रीक तारेची चोरी करणार्या शिरूडमधील टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. संशयीतांकडून दोन लाखांच्या वाहनासह दोन लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या संशयीतांना पडल्या बेड्या
अटकेतील आरोपींमध्ये दादाभाऊ ईश्वर महाले (25), अतिष किरण शिरसाठ (23) व विक्की सुभाष कोळी (28), रामदास बालु कोळी (32), अनिकेत राजेंद्र कोळी (25, सर्व रा.शिरुड, ता.धुळे) यांचा समावेश आहे.
असे आहे नेमके प्रकरण ?
जुनवणे, जि.धुळे शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांचे शेतातील एलटी लाईनच्या पोल वरील अॅल्युमिनीअमची तार (अंदाजे 450 फुट) लांबवण्यात आली होती. ही घटना 04 ऑक्टोबर रोजी रात्री 01.30 वाजेच्या सुमारास घडली. वीज कंपनीचे संजय सीताराम वळवी (बोरकुंड) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना चोरट्यांबाबत माहिती मिळताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप व तार जप्त करण्यात आली.
यांनी केली गुन्ह्याची उकल
धुळे तालुका पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, हवालदार मनोज शिरसाठ, हवालदार ललित खळगे, हवालदार कुणाल पानपाटील, कॉन्स्टेबल विशाल पाटील, राहुल देवरे, रवींद्र सोनवणे, कांतीलाल शिरसाठ, चालक प्रकाश माळी आदींनी या गुन्ह्याची उकल केली. तपास हवालदार मनोज शिरसाठ करीत आहेत.
