जळगाव तालुक्यातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार


Minor girl raped in Jalgaon taluka जळगाव (10 ऑक्टोबर 2025) : जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले तरुणीसोबत?
जळगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय पीडीता कुटूंबासह वास्तव्यास आहे. शिक्षणानिमित्त ती जळगावातील एका टायपिंग क्लासला येत असल्याने तेथे गावातील संशयीत सातत्याने तरुणीचा पाठलाग करीत एके दिवशी तिला फिरायला चल म्हणून मित्राच्या रूममवर नेत अत्याचार केला. हा प्रकार तीन ते चार वेळा घडला व संशयीत पुन्हा-पुन्हा संबंधासाठी दबाव वाढत असल्याने पीडीतेने कुटूंबाला ही बाब सांगितल्यानंतर आरोपीविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, अत्याचाराची घटना एप्रिल 2025 ते 6 ऑक्टोबर 2025 दरम्यान घडली. तपास सहाययक निरीक्षक अनंत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !