भुसावळात रनिंग रूमच्या निकृष्ट जेवणावर टीसींचा बहिष्कार ; जेवणाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी


भुसावळ (10 ऑक्टोबर 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळातील तिकीट निरीक्षकांसाठी असलेल्या रनिंग रूममधील जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याच्या आरोपावरून तिकीट निरीक्षकांनी तेथील जेवणावर गुरूवारपासून बहिष्कार टाकला. गेल्या काही दिवसांपासून मिळणार्‍या निकृष्ट अन्नाबाबत तिकीट निरीक्षक संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यात जेवणाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी करण्यात आली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

निकृष्ट जेवणाचे जेवण
तिकीट निरीक्षकांनी खाजगीत बोलतांना सांगितले की, रनिंग रुममधील जेवण अत्यंत वाईट दर्जाचे असून त्यावर कोणतीही देखरेख किंवा नियंत्रण नाही. ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याने कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत जेवणाची गुणवत्ता सुधारली जात नाही, तोपर्यंत आम्ही रनिंग रूममधील जेवणावर बहिष्कार कायम ठेवणार, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणावर वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांनी रनिंग रूममधील जेवण निकृष्ट असल्याचे आरोप खरे नाहीत. कर्मचार्‍यांना तिथे जेवण करायचे की बाहेर, हे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !