मुक्ताईनगरात पेट्रोल पंप लुटणार्या दरोडेखोरांनी अन्य दोन पंपावरही केली लूट : 16 संशयीत चौकशीकामी ताब्यात

The robbers who robbed a petrol pump in Muktainagar also robbed two other pumps: 16 suspects are in custody for questioning मुक्ताईनगर (11 ऑक्टोबर 2025) : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील लूट दरोडेखोरांनी मुक्ताईनगर नंतर अन्य दोन पंपावरही लूट केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चौकशीकामी तब्बल 16 संशयीतांना राऊंड अप केले आहे मात्र अद्यापपर्यंत ठोसे धोगेदारे मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे आहे लूट प्रकरण
मुक्ताईनगर शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मंगळवार, 9 रोजी रात्री साडेअकरा वाजेनंतर तीन पेट्रोल पंपावर एकापाठोपाठ दरोडे टाकण्यात आले. या घटनेत पाच अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सुमारे एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. पोलिसांनी भुसावळमधील 10 तर फैजपूर येथील सहा अशा 16 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या रक्षा ऑटोफ्युअल पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पाच दरोडेखोर आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत कर्मचारी प्रकाश माळी व दीपक खोसे यांना मारहाण केली. यावेळी डिझेल भरण्यासाठी थांबलेला ट्रक चालक व त्याच्या साथीदारालाही मारहाण करून केबिनमध्ये डांबले. त्यानंतर रोकड हिसकावून चोरट्यांनी पलायन केले.
त्यानंतर मनुभाई आशिर्वाद पेट्रोल पंप (कर्की फाटा ता. मुक्ताईनगर) व सय्यद पेट्रोल पंप (तळवेल फाटा, वरणगाव शिवार, ता. भुसावळ) या ठिकाणी दरोडा टाकण्यात आला. तिन्ही ठिकाणाहून चोरट्यांनी रोकड, मोबाइल आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लांबवण्यात आला.
वरणगाव परिसरात लूटीदरम्यान दरोडेखोर जखमी
भुसावळ शिवारातील तळवेल फाटा येथे महामार्गावर असलेल्या सय्यद पेट्रोल पंपावर 9 ऑक्टोबरला पाच दरोडेखोरांनी कर्मचार्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच किरकोळ रक्कम घेऊन पोबारा केला. दरोडेखोर हिंदीतून बोलत होते. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. दरोडेखोरांनी प्रथम पंपावरील कर्मचारी मदन हिवरे यांना मारहाण करून त्यांना कॅबिनमध्ये ओढून नेले. तेथे उपस्थित रामदास गोपाळ आणि तसलीम अन्सारी या कर्मचार्यांनाही बंदुकीचा धाक दाखवला तसेच पैसे मागितले. पण पंप मालकाने सायंकाळी दिवसभरात जमा झालेली रक्कम नेल्याने लूट टळली.
यावेळी कॅबीनमधील सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर यंत्रणा, ऑटोमेशन मशीन आणि इतर सामग्रीची तोडफोड करताना एका दरोडेखोराच्या हाताला काच लागून तो जखमी झाला. त्याचे रक्त घटनास्थळी आढळले. दरोडेखोरांनी कर्मचार्यांकडे असलेले पैसे घेऊन पळ काढला.
