भुसावळात चाकू हल्ल्यात माय-लेक जखमी : पाच जणांविरोधात गुन्हा


My-Lake injured in knife attack in Bhusawal : Case filed against five people भुसावळ (13 ऑक्टोबर 2025) : लोणचे पैसे फेडण्याच्या वादातून शहरातील कवाडे नगरात महिलेसह तिच्या मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार, 12 रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली. रत्नमाला शरद बाविस्कर (38) व प्रतीक शरद बाविस्कर (दोन्ही रा.कवाडे नगर, भुसावळ) अशी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

काय घडले कवाडे नगरात ?
रत्नमाला शरद बाविस्कर (कवाडे नगर) यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या नावाचे सुर्योदय बँकेत खाते काढून त्यावर संशयीतांनी 50 हजारांची लोण काढले व हे पैसे तक्रारदाराने फेडण्यासाठी संशयीतांनी दबाव टाकला तसेच रविवारी सकाळी 10 वाजता घरी येत अश्लील शिविगाळ करीत फिर्यादीसह तिच्या मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी याप्रकरणी छकूबाई उर्फ रेखाबाई दीपक म्यांद्रेसह, छक्कूबाईचा भाचा, पुतण्या, व दादू व अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. छकूबाई यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली. पोलिसासांकडून या भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासणी केली जात आहे. तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल भंडारे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !