नाशिकमध्ये लेडी डॉनचा माज पोलिसांनी उतरवला

Police bust Lady Don in Nashik नाशिक (13 ऑक्टोबर 2025) : नाशिकमध्ये गुन्हेगारांवर पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू असताना आता लेडी डॉनचाही पोलिसांनी माज उतरवल्याचा प्रकार घडला आहे.
भावा, इथे इज्जत दिली तर इज्जत भेटलं, नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटलं असा धमकीवजा संवाद असलेलं रील व्हायरल करणार्या दोन तरुणींचा माज नाशिक पोलिसांनी उतरवला आहे. दोन मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला होता. हे नाशिक आहे भावा, तु येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हीलला भेटेल, असं या तरुणींनी आपल्या रीलमध्ये म्हटलं होतं.
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध सुरु केला. पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. या तरुणींकडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला.’ असे पोलिसांनी वदवून घेतले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या घटनेनंतर आता नाशिकच्या पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
