73 हजारांची लाच भोवली : भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवालासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (13 ऑक्टोबर 2025) : वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल व खाजगी पंटराला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सोमवार, 13 रोजी दुपारी करण्यात आल्याने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अटकेतील आरोपींमध्ये वराडसीम तलाठी नितीन पंडितराव केले, कठोरा कोतवाल जयराज भालेराव व खाजगी पंटर शिवदत्त लटकन कोळी

जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

एकाच वेळी तिघांवर कारवाई
जिल्ह्यात वाळू वाहतूक बंद असलीतरी वरिष्ठांच्या आदेशाने बिनदिक्कतपणे वाळू सुरू आहे. त्यातच वाळू वाहतुकीच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी व वाळू वाहतूक सुरू राहू देण्यासाठी 73 हजारांची लाच मागण्यात आली होती.

(हा सापळा आत्ताच झाल्याने लवकरच आम्ही सविस्तर अपडेट करू)





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !