क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार !


Sports Minister Manikrao Kokate’s brother will join BJP today! नाशिक (15 ऑक्टोबर 2025) : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे हे भाजपात गुरुवारी प्रवेश करीत असून मंत्री गिरीश महाजन, देशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होईल.

भारत कोकाटे यांनी 2022 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. भारत कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे गावाचे सरपंच, तसेच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन व विशेष कार्यकारी सोसायटी या महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले आहे. भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिन्नरमध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांची कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे पाहिले जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, या निवडणुकीत त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांच्यासमोर राजकीय अडथळे उभे राहू लागले आहेत. मंत्री कोकाटे यांना यापूर्वीच, विशेषतः गेल्या विधानसभा निवडणुकीत घरातूनच विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या सख्ख्या भावासोब म्हणजेच भारत कोकाटे यांच्यासोबत गेले काही वर्ष मतभेद सुरू आहेत आणि याचा थेट परिणाम कोकाटे कुटुंबाच्या राजकीय प्रवासावर झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी थेट मंत्री कोकाटे यांना आव्हान देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटात सक्रिय सहभाग घेतला आणि तालुक्यात अनेक ठिकाणी मंत्री कोकाटे यांना विरोध केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !