बसच्या आगीत 20 प्रवासी जिवंत जळाले

दुचाकी धडकून बसच्या इंधन टाकीवर आदळल्याने आग भडकली ; 40 प्रवासी करीत होते प्रवास


20 passengers burnt alive in bus fire कुर्नूल (24 ऑक्टोबर 2025)  दुचाकी बसच्या इंधन टाकीवर आदळल्याने लागलेल्या आगीत बसमधील तब्बल 20 प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकुरजवळ शुक्रवारी पहाटे 3:30 च्या सुमारास घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

हैदराबादहून बेंगळुरूला जाणारी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर एका दुचाकीला धडकली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे बसने लगेचच पेट घेतला. या अपघातात शिवशंकर नावाच्या चालकाचाही मृत्यू झाला.

बसमध्ये अंदाजे 40 प्रवासी होते. त्यापैकी बरेच जण भाजले होते. 19 जणांनी उडी मारून जीव वाचवला. आपत्कालीन गेट तोडून जीव वाचवणारे लोक गंभीर भाजले होते आणि त्यांना कुर्नूल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांचे म्हणणे आहे की अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !