डांभूर्णीत वयोवृद्धेच्या मृत्यूनंतर अंघोळीदरम्यान पुन्हा सुरू झाला श्वास

अर्ध्या तासात पुन्हा वृद्धा गतप्राण : घटनेची यावल तालुक्यात जोरदार चर्चा


Elderly man in Dambhurni, after death, resumes breathing during bath यावल (1 नोव्हेंबर 2025) : यावल तालुक्यातील डांभूर्णी गावातील 92 वर्षीय महिलेचे शुक्रवारी दुपारी निधन झाले मात्र दोन तासांनी अंत्यविधीची तयारी सुरू असताना व स्नान केले जाताना वयोवृद्धा जिवंत झाल्यानंतर खळबळ उडाली. यावेळी वृद्धेने नातगलांशी पुन्हा अर्धातास संवाद साधल्यानंतर तिने प्राण त्यागले. वृध्द महिला पुन्हा खरचं मयत झाली का ? याची खात्री करण्या करीता डॉक्टरांना बोलवावे लागले व मृत्यूचे निदान झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता तिच्यावर अंतसंस्कार करण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण ?
डांभूर्णीतील मंजुळा मिठाराम फालक (92) ही वयोवृद्धा शुक्रवारी सकाळी नित्याप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांनी जेवण केले व 12 वाजता वृद्धेचे निधन झालं. याबाबतचा निरोप नातेवाईकांना देण्यात आला. त्यानुसार सर्व नातेवाईक डांभूर्णी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी दोन वाजता अंत्यविधीची तयारी केली. वृद्धेला अखेरची अंघोळ घालण्यात आली. अंघोळीदरम्यान वृद्धेने अचानक सुनेचा हात पकडला व डोळे उघडले. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

अर्धा तास संवाद
यावेळी वृध्देसोबत संवाद साधण्यात आला शोकमय वातावरण आनंदात परावर्तीत झाले मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही व अर्ध्यातासाने अडीच वाजता या वृध्द महिलेने पुन्हा प्राण त्यागले. वृद्धेच्या मृत्यूवर नातलगांचा विश्वास बसत नसल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आले व त्यांनी मयत घोषीत केल्यानंतर सायंकाळी अंत्यंस्कार करण्यात आले. वृध्द महिलेच्या मृत झाल्यानंतर पुन्हा जिवंत झाल्याची चर्चा पंचक्रोशीसह तालुक्यात सायंकाळ नंतर सर्वत्र होती.

तीन तास पुन्हा पाहिली वाट
शुक्रवारी दुपारी दोन वाजेला पुन्हा जिवंत झालेल्या मंजुळाबाई या अडीच वाजेला पुन्हा मयत झाल्या. असे असले तरी कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉक्टरांच्या तपासणीनंतर व मयत घोषीत केल्या नंतर देखील पुन्ही तीन तास वाट पाहिली व शेवटी सायंकाळी हा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !