यावल शहरात श्रीकृष्णाष्टमी उत्साहात


यावल- शहरातील सीबीएससी पॅटर्न असलेल्या रोजपेटल्स पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गोविंदा आला….. रे आला च्या गजरात श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत नृत्य करत रोजपेटल्स पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यानी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय चव्हाण व बबलू येवले यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण गोपिका यांच्या वेशभूषा साकारत गरबा सादर केला. संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्य अश्विनी येवले व सरीता भाउसकर, संजीता तडवी, मोना महाजन व शाळेतील कर्मचारी रवींद्र शिवदे व रवींद्र सुरवाडे यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.