भुसावळातील भोळे महाविद्यालयातील अर्जुन बोयतची आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड
Arjun Boyat from Bhole College, Bhusawal selected for inter-divisional cross country competition भुसावळ (12 नोव्हेंबर 2025) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळविला. ही स्पर्धा संत मुक्ताई महाविद्यालयात 8 व 9 नोव्हेंबर रोजी झाल्या. महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी अर्जुन बोयत याने दहा किलोमीटर धावणे प्रकारात पाचवा क्रमांक मिळवल्याने त्याची जळगाव विभाग क्रॉस कंट्री संघात निवड झाली. आंतर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा निजामपूर-जैताने नंदुरबार होत आहेत.
यशस्वी खेळाडूचा सत्कार
यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी खेळाडूचा सत्कार केला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण उपस्थित होते. खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी व माजी खेळाडू कॉन्स्टेबल दिग्विजय दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.


