अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : अमळनेर, मारवाडसह दोंडाईचा, नरडाणा भागातील चोरीच्या 24 दुचाकींसह चोरटे जाळ्यात


Amalner police take major action: Thieves from Amalner, Marwar, Dondai, Nardana areas caught with 24 stolen two-wheelers अमळनेर (12 नोव्हेंबर 2025) : अमळनेर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या मोहिमेनंतर गोपनीय माहितीच्या आधारे शहादा तालुक्यातील अट्टल दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हिंमत रेहज्या पावरा व अंबालाल भुरट्या खरडे (दोन्ही रा.सातपिंप्री, ता.शहादा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अमळनेरसह मारवड, पारोळा, दोंडाईचा व नरडाणा भागातून 15 लाख 63 हजार रुपये किंमतीच्या तब्बल 24 चोरीच्या दुचाकी काढून दिल्या आहेत.

दुचाकी चोरीच्या सत्रानंतर कारवाई
अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतून सातत्याने दुचाकी चोरी होत असल्याने शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि स्थानिक माहितीचा उपयोग करीत दुचाकी चोरट्यांचा माग काढला. संशयीत धडगांव तालुक्यातील जंगल परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आरोपींनी अमळनेर हद्दीतून चार, मारवड हद्दीतून चार, पारोळा हद्दीतून तीन तर दोंडाईचा व नरडाणा हद्दीतून 13 दुचाकी चोरी केल्याची कबुली देत 24 दुचाकी काढून दिल्या. आरोपींनी आणखी दुचाकी चोरी केल्याचा संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. जप्त वाहनांमध्ये होंडा यूनिकॉर्न, शाईन, बजाज प्लसर, टीव्हीएस रायडर व हिीरो स्प्लेंडर वाहनांचा समावेश आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ.महहेश्वरी रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. तपास हवालदार काशीनाथ पाटील व कॉन्स्टेबल सागर साळुंखे करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !