जळगावात वर्चस्व वादातून गोळीबारात एकाची हत्या : दोघा आरोपींना बेड्या
One killed in shooting over dominance dispute in Jalgaon: Two accused arrested जळगाव (13 नोव्हेंबर 2025) : नशिराबाद हद्दीतील कुंटणखान्याची टीप दिल्याच्या व वर्चस्व वादातून झालेल्या गोळीबारात आकाश उर्फ टपर्या बाविस्कर या तरुणाचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हा गोळीबार हद्दपार संशयीत आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय 25) याने केल्यानंतर पळ काढला होता. संशयीतासह अन्य एकाला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
या संशयीताविरोधात दाखल आहे गुन्हा
आरोपी डोयाने केलेल्या गोळीबारात लाडू गँगमधील टपर्या बाविस्कर या तरुणाच्या छातीला छातीला आणि गणेश उर्फ काल्या सोनवणे याच्या हाताला गोळी लागली होती. जखमी आकाश उर्फ टपर्या बाविस्कर याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संशयीत पसार झाले होते.
मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आकाश उर्फ डोया सपकाळेसह गणेश उर्फ काल्या सोनवणे, विक्की चौधरी, सागर सुधाकर पाटील, तुषार उर्फ साबू सोनवणे व करण पाटील (वय 25) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोळीबारानंतर मुख्य संशयित आकाश उर्फ डोया सपकाळे आणि करण पाटील हे दोघे पसार झाले पोलिस त्यांच्या मागावर असताना ते शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये लपून बसले होते. जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना हे दोघे संशयित डीमार्ट परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी डीमार्ट परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर संशयितांना शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तपास अधिकार्यांनी बुधवारी आकाश सपकाळे आणि करण पाटील या दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ही 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


