फरीदाबाद मॉड्यूल वेळेवर आले उघडकीस अन्यथा 6 रोजी दिल्ली हादरवणारा स्फोट घडला असता !
Faridabad module was revealed on time, otherwise the blast that shook Delhi would have happened on the 6th! नवी दिल्ली (13 नोव्हेंबर 2025) : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. खर तरे फरीदाबाद मॉड्यूल वेळेवर उघडकीस आले नसते तर 6 डिसेंबरला दिल्लीला हादरवणारा स्फोट झाला असता, अशी धक्कादायम माहिती समोर आली आहे.
घाबरून स्फोट घडल्याचा दावा
दिल्लीत स्फोटकांनी भरलेली कार चालवणारा 28 वर्षीय डॉ. उमर नबी या कटाचा सूत्रधार असून उमर नबी हा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असून फरीदाबादमधील अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता. तपासात असे दिसून आले की, उमर हा जैश-ए-मोहम्मद या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित ‘व्हाइट-कॉलर’ मॉड्यूलचा प्रमुख भाग होता. ज्याचे जाळे काश्मीर, हरयाणा व उत्तर प्रदेशपर्यंत पसरले होते. डॉ. ुझमिल अहमद गनीच्या अटकेनंतर उमरची योजना फसली. गनीच्या घरातून 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडल्यानंतर उमर घाबरला आणि 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट बहुधा घाईत घडवलेला असावा, असा अधिकार्यांचा अंदाज आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक झाली आहे. त्यातले सात काश्मीर तर एक जण लखनौचा आहे.
अरिफ निसार डार, यासीर-उल-अशरफ, मकसूद अहमद डार (सर्व श्रीनगरचे), मौलवी इरफान अहमद (शोपियान), झमीर अहमद आहंगर (गंदरबल), डॉ. मुझमिल गनी (पुलवामा), डॉ. आदिल (कुलगाम) आणि डॉ. शाहीद सईद (लखनौ) यांचा त्यात समावेश आहे.


