निवडणुकीची कामे देताना शिक्षकांच्या दर्जाचे भान ठेवा : प्र.ह.दलाल


Be aware of the quality of teachers while assigning election tasks: P.H. Dalal भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : राज्यात सर्वत्र नगरपरिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते म्हणून काही माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसह पटावरील सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामाबाबत संबंधित अधिकार्‍यांनी आदेश दिले आहेत मग शाळा बंद ठेवायच्या का? मात्र शाळेला सुटी द्यायची की नाही याबाबत शिक्षण खात्याकडून काहीही आदेश नाही. या गोंधळामुळे मुख्याध्यापक मात्र संभ्रमात सापडले आहेत.

अधिकार्‍यांमध्ये ताळमेळच नाही
महसूल व शिक्षण खात्यातील अधिकार्‍यांचा आपसात कोणताच ताळमेळ न राहिल्याने ही विचित्र स्थिती उद्भवली आहे. त्याचे निराकरण करावे तसेच शिक्षकांना निवडणुकीची कामे देतानाही त्यांच्या दर्जाचे भान ठेवले जात नाही. वास्तविकता महसूलकडून प्रत्येक शाळेतील शिक्षकांची नावे मागवितानाच त्याचे पद, पगार ,एकूण सेवा आदी माहिती मागवली जाते. ही माहिती दुर्लक्षित करून शाळेतील प्रयोग शाळा सहाय्यक केंद्र अध्यक्ष, किंवा मतदान अधिकारी 1 आणि वरिष्ठ शिक्षकास त्या खाली दुय्यम स्थानावर नियुकी दिली गेल्याची उदाहरणे गेल्यावेळी आढळून आली. हा शिक्षकांचा अपमान नाही का? त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती हे लक्षात घेऊन यावेळी तरी असे होऊ नये शिक्षकांच्या दर्जाचे योग्य ते भान ठेवूनच त्यांना निवडणुकीचे काम द्यावे, अशी मागणी करणारे पत्र शिक्षकांचे जेष्ठ नेते तथा भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !