भुसावळातील तापी नदी पुलावर खड्ड्यांमुळे वाढला मोठ्या अपघातांचा धोका

रिफ्लेक्टर, दोन्ही बाजूंनी गतीरोधक आवश्यक


Potholes on the Tapi River bridge in Bhusawal increase the risk of major accidents भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : यावल रोडवरील वन विभागाचा नाका ते तापी पुलापर्यंतचा रस्ता अखेरची घटका मोजत आहे. यानंतर आता तापी पुलावरही खड्डे वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आधीच अरुंद असलेल्या या पुलावर सायंकाळी अनेक जण फिरण्यासाठी येतात. वाहनांची पार्किंग होते. त्यातच खड्डयांमुळे अपघातांची भिती वाढली आहे.

अपघाताची वाढली शक्यता
सव्वा वर्षांपूर्वी तापीपुलाचा जुना टोल नाका ते तापीनगर रिक्षा स्टॉप या रस्त्याचे डांबरीकरण झाले मात्र यावरही राहुल नगर, सबस्टेशन परिसर, वनविभागाचा नाका आदी ठिकाणी खड्डे वाढले आहेत. तापी पुलावरील तुटलेले कठड्यांची डागडूजी पूर्ण केली मात्र अद्यापही पुलावर खड्डे कायम आहेत. या पुलावर खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही भीती आहे. पुलावरील कठड्यांना रंगरंगोटी व रिफ्लेक्टर बसविल्यास तसेच नियमीत स्वच्छता करुन कठडयांजवळील माती काढणे आवश्यक आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्यास अपघाताची शक्यता वाढली आहे.

पुलांवर तरुणांचे जथ्थे
शहरातील तापी नदीच्या पुलावर सायंकाळी फिरण्यासाठी येणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. तरुणांचे जथ्थे आपल्या दुचाकी पार्क करुन कठड्यांजवळ बसतात मात्र ही जागा फिरण्याची किंवा तेथे बसण्याची नाही? याचा तरुणांना विसर पडला आहे. पुलावरील खड्डयांमुळे वाहन नियंत्रीत होऊन मोठ्या अपघातांची भीती आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !