भुसावळच्या वकिलाला फेसबुक जाहिरातीमुळे 21 लाखांचा ऑनलाईन ‘गंडा’
Bhusawal lawyer faces online ‘scam’ of Rs 21 lakh due to Facebook advertisement जळगाव (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळातील वकिल सोशल मिडीयावरील फेसबुकवरील जाहिरातीला भाळल्यानंतर भामट्यांनी तब्बल 21 लाख 52 हजार 365 रुपयांचा गंडा घातला. फसवणुकीचा हा प्रकार 1 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडला.
काय घडले वकिलसोबत ?
भुसावळातील 49 वर्षीय वकील हे फेसबुक पाहत असताना त्यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याविषयीची एक जाहिरात दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यानंतर लगेचच त्यांना टेलिग्रामवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले.

वकिलाने लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना ‘अभय’ नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. अभयने त्यांना शेअर्स ट्रेडिंगमधील गुंतवणुकीविषयी माहिती दिली आणि त्यांचे नवीन टेलिग्राम खाते उघडण्यासाठी सांगितले. या खात्यावर आलेल्या मेसेजनुसार तक्रारदार वकिल स्वताची माहिती देत गेले. यानंतर ‘नोमन’ नावाच्या एका व्यक्तीने, जो स्वतला कंपनीचा सिनीयर मॅनेजर म्हणवत होता, त्याने संपर्क साधला. सुरुवातीला 19 हजार 163 रुपये भरण्यास सांगितले.
फसवणूक करणार्यांनी वेळोवेळी विविध कारणे सांगून वकिलाला पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानुसार वकिलाने त्यांच्या बँक खात्यातून एकूण 21 लाख 52 हजार 363 रुपये पाठवले. गुंतवणूक केलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, अभय आणि नोमन या दोघांनीही संपर्क साधला नाही. त्यांनी जेव्हा संपर्क केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ‘ती रक्कम आता ट्रेडमध्ये आहे आणि ती काढता येणार नाही.’ आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वकिलाने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला.


