भुसावळ पालिका निवडणूक : नऊ उमेदवारांच्या हरकती फेटाळताच समर्थकांचा जल्लोष
Bhusawal Municipal Election: Supporters celebrate as objections of nine candidates are rejected भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : पालिकेच्या निवडणूकीत मंगळवारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या नऊ हरकतींवर सुनावणी घेण्यात आली होती. बुधवार, 19 निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी हरकती फेटाळल्यानंतर उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
नऊ हरकती फेटाळल्या
पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात नऊ उमेदवारांनी एकमेकांविरूध्द हरकती घेतल्या होत्या. छाननी झाल्यावर रात्री नऊ वाजता अर्जदारांचा आणि संबंधितांचे म्हणणे ऐकून संबंधितांना बुधवारी यावर निर्णय देण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी आलेल्या 9 हरकतींवर विविध स्पष्टीकरण देवून त्या फेटाळल्या. यामुळे उमेदवारांचे निवडणूकीचे मार्ग मोकळे झाले.



