भुसावळ पालिका निवडणूक : तीन उमेदवारांची माघार
Bhusawal Municipality Election : Three candidates withdraw भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली आहे.
तीन उमेदवारांची माघार
उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी धीरज अनिल चौधरी हे प्रभाग क्रमांक पाच ब मधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढणार असल्याने त्यांनी प्रभाग 11 अ मधूनही अर्ज भरला असल्याने त्यांनी येथील अर्ज मागे घेतला.

प्रभाग 16 अ मधून निलेश भास्कर पाटील तर प्रभाग 18 मधून साहील सोहील खान या तीन उमेदवारांनी त्यांची उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे येत्या दोन दिवसात अजून कोणकोण उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांसह राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.


