भुसावळात 27 वाहनांवर पोलिसांची कारवाई
Police take action against 27 vehicles in Bhusawal भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेतर्फे बुधवारी संध्याकाळी यावल रोडवर वाहनांची तपासणी करण्यात आली.
विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे नसणे, तीन सीट वाहन चालविणे अश्या विविध कलमांखाली वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. दररेाज ही कारवाई विविध चौकात थांबून केली जाणार असल्याचे महाले यांनी सांगितले.



