एरंडोलमध्ये भीषण अपघात : पहाटे फिरण्यास निघालेल्या तहसील कर्मचार्‍याचा मृत्यू


Terrible accident in Erandol: Tehsil employee dies while going for a morning walk एरंडोल (20 नोव्हेंबर 2025) :  पहाटेच्या मॉर्निंग वॉकला निघालेल्या एरंडोल तहसील कार्यालयातील कर्मचार्‍याचा ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला. एरंडोल-पारोळा रस्त्यावर गुरुवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. शिवाजी रघुनाथ महाजन (42, रा.पारोळा, ह.मु. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) असे मृताचे नाव आहे.

काय घडले शहरात ?
महाजन हे एरंडोल-पारोळा मार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर मॉर्निंग वॉक करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या (एच.आर. 38 ए.डी. 4136) रिकाम्या डंपरने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एरंडोल शहरात मोठी खळबळ उडाली.

हवालदार राजू पाटील, अमोल भोसले आणि विजू पाटील यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली मात्र अपघात होताच डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी डंपर जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केले. मयत शिवाजी महाजन यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, एरंडोल येथे शवविच्छेदनासाठी हलवले आहे.

ज्या डंपरमुळे हा अपघात झाला, ते डंपर एरंडोल-धरणगाव रस्त्याचे सुरू असलेल्या कामासाठी मुरूम वाहतूक करत असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली. एरंडोल शहरातील नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला. निकृष्ट दर्जाच्या आणि अपूर्ण हायवेच्या कामामुळे आजवर एरंडोलकरांनी 20 ते 25 जणांचा जीव गमावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सततच्या अपघातांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पसार डंपर चालकाचा एरंडोल पोलीस कसून शोध घेत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !