मुक्ताईनगरात 23 लाखांचा गांजा जप्त !

जळगाव गुन्हे शाखेसह मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई


Ganja worth Rs 23 lakh seized in Muktainagar! मुक्ताईनगर (20 नोव्हेंबर 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारातील शेतात केळी बागेआड गांजा उगवण्यात आल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत मनोज नामदेव घटे (40, रा.मानेगाव, ता.मुक्ताईनगर) यास बेड्या ठोकल्या तर 341 किलो 500 ग्रॅम वजनाचा व 23 लाख 22 हजार 200 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, मुक्ताईनगर उपअधीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सुनील दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, छगन तायडे, रतन गीते, मयुर निकम, रवींद्र चौधरी, चालक भरत पाटील. तसेच मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ, एपीआय जयेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, हवालदार चंद्रकांत बोदडे, नाईक मोतीलाल बोरसे, कॉन्स्टेबल चेतन महाजन, रवींद्र धनगर, दीपक ठाकरे, गोविंद पवार, श्रावण भील, जितेंद्र महाजन आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !