भुसावळात माघारीपूर्वीच राजकीय नाट्य : अपक्ष उमेदवार सहलीवर ; प्रस्थापिताना भरली धडकी !
Political drama even before returning to Bhusawal: Independent candidate on tour; A shock to the establishment! भुसावळ (21 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिकेची निवडणूक अत्यंत रंजक वळणावर आली असून राजकीय आखाडा गाजत असतानाच शुक्रवारी माघारीचा अखेरचा दिवस असतानाच अनेक प्रभागातील अपक्ष उमेदवार सहलीवर रवाना होवून नॉट रिचेबल झाले आहेत. या प्रकारानंतर उमेदवारी जाहीर झालेल्या अधिकृत उमेदवारांच्या गोटात प्रचंड धडकी भरली आहे. अपक्ष उमेदवार आता माघारीनंतरच शहरात प्रकट होतील व त्यामुळे चुरशीची निवडणूक होईल, यात शंकाच नाही.
कोण-कोण झाले नॉट रिचेबल
भुसावळातील प्रभाग क्रमांक आठची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आहे व येथे भाजपाचे नगरसेवक मुकेश पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे मात्र तेही नॉट रिचेबल आहेत त्याचप्रमाणे प्रभाग 1 मधील अपक्ष उमेदवार गिरीश पाटील यांच्यासह अन्य दोन अपक्ष उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. वारंवार प्रयत्न करूनही या अपक्ष उमेदवारांशी संपर्कच होत सल्याने मुख्य राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवणार्या उमेदवारांना मत विभागणीच्या भीतीने धडकी भरली आहे.


बुधवारी 13 जणांची माघार
बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांनी माघार घेतली. गुरुवारी रिंगणातील 13 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. म्हणजे दोन दिवसांत 16 उमेदवार रिंगणाबाहेर पडले. मात्र, नगराध्यक्षपदाच्या 12 पैकी एकाही उमेदवाराने अद्याप माघार घेतलेली नाही.
अपक्षांची मनधरणी
गुरुवारी दुपारपासून राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेत्यांकडून अपक्षांची मनधरणी सरू होती. प्रामुख्याने अडचणीच्या ठरणार्या अपक्षांची माघार व्हावी म्हणून तडजोडीच्या बैठका झाल्या. ाहींना स्वीकृत नगरसेवक, संघटनेत पद देण्याचे आमिष देण्यात आले पण गुरुवारी एकही दखलपात्र अपक्षाने माघार घेतली नाही.
दरम्यान, पालिका निवडणुकीत शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येईल, केवळ अपिलात गेलेल्या उमेदवारांसाठी माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर असल्याचे निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले.


