जळगावातून चोरट्यांनी महागडी कार लांबवली


जळगाव (21 नोव्हेंबर 2025) : शहरातील दीक्षीतवाडी परिसरातील तुकाराम वाडी भागातून महागडी कार (क्रमांक एम.एच.19 सी.यु. 4422) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लांबवली. नेहमीप्रमाणे पार्किंग केलेल्या ठिकाणाहून कार चोरी झाल्याने वाहनधारक धास्तावले आहेत.

काय घडले जळगावात ?
तुकारामवाडी परिसरातील सचिन शंकर चौधरी (36) यांनी आपली हुंडाई आय-20 कार नेहमीप्रमाणे व्यायामशाळेजवळील पटांगणाच्या मोकळ्या जागेत, एका स्पेअर पार्ट दुकानासमोर रात्री पार्क केली होती. सकाळी उठून पाहिल्यावर त्यांना कार जागेवर दिसली नाही.



शोध घेऊनही कार जागेवर नसल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी संपूर्ण परिसरात आणि आजूबाजूला कसून शोध घेतला. तसेच, परिसरातील लोकांकडे चौकशी केली, परंतु कारचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.

अखेर सचिन चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोषूस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !