यावल नगरपालिकेत 23 जागांसाठी 76 उमेदवार रिंगणात
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता होणार चौरंगी लढत
76 candidates in fray for 23 seats in Yaval Municipality यावल (21 नोव्हेंबर 2025) : यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे दोन तर नगरसेवक पदाचे 19 अर्ज मागे घेण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे दोन व नगरसेवक पदाचे 26 अर्ज मागे घेण्यात आले. आता येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरीता भाजपा, शिवसेना शिदे गट, शिवसेना उबाठा व अपक्ष अशी चौरंगी लढत होईल तर 11 वॉर्डातील 23 जागे करीता 76 उमेदवार रिंगणात आहे.
माघारीनंतर चित्र स्पष्ट
यावल नगरपरिषद निवडणुकीत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार चैताली पाटील व आफरीन अंजुम शेख यांचे दोन अर्ज मागे घेण्यात आले. नगरसेवक पदाकरीता 19 उमेदवारांनी माघार घेतली. यात नगरसेवक पदाकरीता बुधवारी एक तर गुरुवारी सहा उमेदवारी व शुक्रवारी 19 असे एकूण 26 अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज माघार घेण्याकरीता व कोण-कोण माघार घेत आहे हे पाहण्याकरीता नगरपरिषदेसमोर गर्दी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी उमेदवारांचे माघारीचे अर्ज स्विकारले. आता लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरीता भाजपाच्या रोहिणी फेगडे, शिवसेना उबाठाच्या छाया पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या स्वाती पाटील व अपक्ष शबानाबी सुलेमानी यांच्या चौरगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे. 11 वॉर्डातील 23 जागांकरीता 76 उमेदवार रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होईल.




