15 हजारांची लाच भोवली : जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक धुळे एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Bribe of Rs 15,000 taken: Draftsman from Jalgaon Public Works Department caught in Dhule ACB’s trap जळगाव (25 नोव्हेंबर 2025) : पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी नाहकरत प्रमाणपत्र देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (53, जळगाव रोड, भुसावळ) यास धुळे एसीबीने सोमवारी सायंकाळी सापळा रचून अटक केली. या कारवाईने सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराची वाकडी, ता.जामनेर येथे गट क्रमांक 139/1/पैकी अ क्षेत्र 27 आर शेतजमीन आहे. या शेतजमिनीतील 1225 चौरस मीटर क्षेत्रात नियोजित पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी करारनामा करण्यात आला आहे. इंडियन ऑईल कंपनी, छत्रपती संभाजीनगर यांनी अलॉटमेंट लेटर देवून पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची नाहरकत मिळण्यासाठी पत्र दिले आहे. जिल्हाधिकारी सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नाहरकत देण्यासंदर्भात पत्राद्वारे सा.बां.विभागाला अभिप्राय विचारला व हा अभिप्राय मिळण्यासाठी तक्रारदारासह त्यांच्या मित्राने वासुदेव धोंडू पाथरवट यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काम करून देण्यासाठी दोन हजार रुपये स्वीकारले व काम झाल्यानंतर 15 हजारांची मागणी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार देण्यात आली. 21 रोजी आरोपीने तक्रारदाराच्या मित्राला पैशांची मागणी केली व सोमवार, 24 रोजी सायंकाळी सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.




यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !