भुसावळातील प्रभाग 14 मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ (25 नोव्हेंबर 2025) : पालिका निवडणुकीतील भाजपाचे प्रभाग क्रमांक 14 अ चे उमेदवार राजेंद्र दत्तात्रय आवटे व प्रभाग क्रमांक 14 ब च्या उमेदवार अंकिता खोले-पाटील यांनी समर्थकांसह मंगळवारी सकाळी 10 वाजता शिवदत्त नगरासह गडकरी नगर भागातील मतदारांची डोअर टू डोअर जावून प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.

प्रभागाचा विकास हाच ध्यास
भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले की, पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरवू. प्रभागाच्या विकासाचे व्हिजन घेवून आम्ही जनतेपुढे जात आहोत. जनतेने संधी दिल्यास मोठ्या प्रमाणावर प्रभागाचा विकास करू यात शंकाच नाही. जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यास आपले प्राधान्य असेल, असे उमेदवार राजेंद्र आवटे व अंकिता खोले पाटील म्हणाल्या.




प्रचार रॅलीला प्रतिसाद
भाजपातील कार्यकर्ता, पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी 10 वाजता शिवदत्त नगरासह गडकरी नगर भागात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत भाजपा उमेदवार राजेंद्र आवटे, अंकिता खोले-पाटील यांच्यासह भाजयुमो शहराध्यक्ष गौरव आवटे, भाजयुमो खजिनदार मनीष पाटील, संदीप वाघोदकर, जयदीप चोपडे, राजेश चंदन, प्रेम खरारे, रोहित पाटील, रोहित कदम आदींसह नागरिकांचा सहभाग होता.

रजनी सावकारे यांचा विजय निश्चित
दोन्ही उमेदवारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीत या प्रभागातून प्रचंड मतांनी आम्ही विजयी होवू, असा विश्वास आम्हाला आहेे शिवाय भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनादेखील प्रचंड मतांनी आम्ही निवडून आणू व जनतेचा आशीर्वाद आम्हाला लाभेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !