भीषण अपघात : मालवाहू वाहनाच्या धडकेने जामनेरातील चौघे युवक ठार
जामनेर (26 नोव्हेंबर 2025) : भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेने जामनेरातील चौघे युवक जागीच ठार झाल.े हा भीषण अपघात मंगळवार, 25 रोजी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर घडला. अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकीरा साबळे आणि रवी सुनील लोंढे (सर्व रा.जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.
काय घडले तरुणांसोबत ?
जामनेर-पहूर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळील वळणावर भरधाव सिल्लोडच्या व्यापार्याकडील मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने चौघे युवक जागीच ठार झाले. मृत युवक जामनेरच्या जामनेरपुरा व भीमनगर भागातील रहिवासी असून 20 ते 22 वयोगटातील आहेत.





