भुसावळातील प्रभाग 14 मध्ये भाजपा उमेदवारांची प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीतील भाजपाचे प्रभाग क्रमांक 14 अ चे उमेदवार राजेंद्र दत्तात्रय आवटे व प्रभाग क्रमांक 14 ब च्या उमेदवार अंकिता खोले-पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभागातील बगीचा हॉटेल मागील मुस्कॉन हॉस्पीटल परिसर बुधवारी सकाळी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांची डोअर टू डोअर जावून प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षणही यावेळी करण्यात आले. प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.
प्रभागाचा विकास हाच ध्यास
भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले की, पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरवू. प्रभागाच्या विकासाचे व्हिजन घेवून आम्ही जनतेपुढे जात आहोत. जनतेने संधी दिल्यास मोठ्या प्रमाणावर प्रभागाचा विकास करू यात शंकाच नाही. जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यास आपले प्राधान्य असेल, असे उमेदवार राजेंद्र आवटे व अंकिता खोले पाटील म्हणाल्या.



भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा विजय निश्चित
नगरपालिका निवडणुकीत या प्रभागातून प्रचंड मतांनी आम्ही विजयी होणार असल्याचा आम्हाला विश्वास अनू भुसावळातील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनादेखील प्रचंड मतांनी आम्ही निवडून आणू व जनतेचा आशीर्वाद आम्हाला लाभेल, असा आशावाद त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


