भुसावळात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आज माजी मंत्री हाजी अनिस साहब यांची जाहीर सभा


भुसावळ (1 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता प्रवीण सुरवाडे यांच्यासह काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार, 1 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता खडका चौफुलीवर माजी मंत्री हाजी अनिस साहब यांची जाहीर सभा होत आहे.

या सभेत काँग्रेसचे सर्व उमेदवार सहभागी होणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्वर खान यांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !