भुसावळात आज भाजपा उमेदवार रजनीताई सावकारे यांच्या प्रचारार्थ महिलांची शक्ती प्रदर्शन रॅली
भुसावळ (30 डिसेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीतील भाजपा-शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीतील नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ जामनेर रोडवरील प्रचार कार्यालयापासून सोमवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता महिलांची शक्ती प्रदर्शन रॅली निघणार आहे.
पदाधिकार्यांना सहभागाचे आवाहन
मंत्री संजय सावकारे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई सावकारे यांच्यासह पदाधिकारी या रॅलीत सहभागी होतील. प्रचार रॅलीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंतराव माहुरकर, सागर चौधरी यांनी केले आहे.





