भुसावळातील राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता डागोर यांची आज पत्रकार परिषद
भुसावळ (30 नोव्हेंबर 2025) : भुसावळातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रभाग नऊ ब मधील उमेदवार ममता अजय डागोर या एका महत्त्वाच्या विषयावर सोमवार, 1 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. प्रभागातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात होणार्या या पत्रकार परिषदेत उमेदवार नेमका कोणता गौप्यस्फोट करतात? याकडे प्रभागातील जनतेचे लक्ष लागले आहे.
इलेक्ट्रॉनिक, प्रिंट व सोशल मिडीयातील माध्यम प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन समाजसेवक अजय कुमार डागोर यांनी केले आहे.





