भुसावळातील प्रभाग एकसाठी डीपीडीसीतून सर्वाधिक निधी दिला : शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय निश्चित होणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
भुसावळ (30 डिसेंबर 2025) : भुसावळातील प्रभाग क्रमांक एकमध्ये आमची भाजपासोबत मैत्री पूर्ण लढत होत आहे. आपण या प्रभागासाठी डीपीडीसीतून सर्वाधिक निधी दिला असून निश्चितपणे लोक विकासाच्या मागे असतात, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरात व्यक्त केले.
भुसावळातील प्रभाग एकमधून आमच्या शिंदे गटाचे उमेदवार अमोल इंगळे व ज्योती लक्ष्मण सोयंके निश्चितपणे विजयी होतील, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.





काय म्हणाले गुलाबराव ?
भुसावळ नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार व माजी नगरसेवक अमोल इंगळे यांच्यासह ज्योती लक्ष्मण सोयंके यांच्याबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या प्रभागात आमची भाजपासोबत आमची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. या प्रभागासाठी आपण डीपीडीसीतून निधी दिला असून साहजिकच लोक विकासाच्या मागे असतात त्यामुळे आगामी काळातही निधीची कमतरता आपण पडू देणार नाहीत. या जागांवरही आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
