भुसावळातील प्रभाग नऊ मधील प्रत्येक बेरोगाराला रोजगार : उमेदवार ममता डागोर यांची ग्वाही


भुसावळ (1 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीत मतदारांनी संधी दिल्यास निश्चितपणे प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निश्चितपणे निराकरण करू शिवाय प्रभागातील मुलींसाठी ग्रंथालय उघडून त्यांच्यासाठी ज्ञानाची कवाडे खुली करण्यात येतील शिवाय प्रत्येक बेरोजगाराला रोजगार व नागरिकांच्या घराबाहेर ट्यूबवेल करून त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता अजय डागोर यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता डागोर व समाजसेवक पती अजय डागोर व कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरिकांची डोअर टू डोअर भेट घेत त्यांना विकासाचे व्हिजन सांगितले.






प्रभागाचा विकास हाच ध्यास
प्रभागाच्या विकासासाठी आपली उमेदवारी असून जनतेने आशीर्वाद दिल्यास निश्चितपणे आपण प्रभागाचा विकास करू, असे उमेदवार ममता डागोर यांनी यावेळी सांगितले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !