राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता डागोर यांची ताकद वाढली : निळा भगवा समर्थकांचा जाहीर पाठिंबा
पाठिंब्याने वाढली ताकद : ममता डागोर यांचा विजय निश्चित ; कार्यकर्त्यांचा विश्वास
भुसावळ (30 डिसेंबर 2025) : प्रभाग क्रमांक नऊचा काया-पालट करण्याचे व्हिजन घेवून निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता अजय डागोर यांना प्रभागातील निळा भगवा समर्थकांनी सोमवार, 1 डिसेंबर रोजी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी उमेदवार ममता डागोर व उमेदवाराचे पती व समाजसेवक अजय डागोर उपस्थित होते. पाठिंब्याने आपली निश्चितपणे ताकद वाढली असून विजयी होवू, असा विश्वास ममता डागोर यांनी व्यक्त केला.
प्रभागाचा विकास हाच ध्यास
प्रभागाच्या विकासासाठी आपली उमेदवारी असून जनतेने आशीर्वाद दिल्यास निश्चितपणे आपण प्रभागाचा विकास करू, असे उमेदवार ममता डागोर यांनी यावेळी सांगितले. नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद तसेच विविध समाजाकडून आपल्या उमेदवारीला पाठिंबा मिळत असून निश्चितपणे विजयी झाल्यानंतर प्रत्येक आश्वासन आपण पूर्ण करू, असा आशावादही ममता डागोर यांनी व्यक्त केला.

मेहतर समाजाने दिला पाठिंबा
मेहतर वाल्मिकी समाजाने एकजूट होत ममता डागोर यांना पाठिंबा दर्शवला आहे. समाजाच्या पाठिंब्याने निश्चितपणे ताकद वाढली असून आपण या निवडणुकीत विजयी होवू, असा विश्वास यावेळी उमेदवार ममता अजय डागोर यांनी व्यक्त केला.