निजामपूर पोलिस ठाण्यातील दोघे हवालदार तडकाफडकी निलंबित : समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण
Two constables of Nizampur police station abruptly suspended: ‘This’ shocking reason revealed धुळे (5 डिसेंबर 2025) : निजामपूर पोलिस ठाण्यात कार्यरत दोन्ही हवालदारांनी तब्बल 200 हून अधिक गुन्ह्यांमधील मुद्देमाल गहाळ केल्याने दोघा कर्मचार्यांना धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी निलंबित केले आहे. या कारवाईने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महेंद्र जाधव व शरद ठाकरे अशी निलंबित हवालदारांची नावे आहेत.
मुद्देमाल गहाळ केल्याचा ठपका
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार निजामपूर पोलिस ठाण्यात महेंद्र जाधव व शरद ठाकरे हे हवालदार कार्यरत असताना त्यांनी 200 हून अधिक गुन्ह्यांतील किंमती मुद्देमाल गायब केला. त्यांना वारंवार सूचना करूनही त्यांनी मुद्देमालाबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. दोघांची अनेकदा चौकशी करूनही त्यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने दोघांना निलंबित करीत त्यांच्याविरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. काही वर्षांपूर्वीचा हा मुद्देमाल असून तपासणीत अलीकडे हा प्रकार उघड झाल्याचे सांगण्यात आले.


