अयोध्या दर्शनाला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात : महिलेचा मृत्यू तर 15 भाविक जखमी


Accident in vehicle of devotees from Jalgaon district who went to Ayodhya darshan : Woman dies, 15 devotees injured जळगाव (6 डिसेंबर 2025) : अयोध्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघात महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 15 ते 20 भाविक जखमी झाले आहे. शनिवार, 6 रोजी पहाटे चार वाजता हा अपघात झाला. छोटीबाई शरद पाटील (35, पिंप्राळा, ता.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

भाविकांच्या वाहनाला अपघात
धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथील भाविक अयोध्यातील भगवान राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर बसने प्रयागराजला जात होते. बसमध्ये अंदाजे 40 भाविक होते. सुलतानपूर येथील कुरेभर चौकात पोहोचताच, समोरून एका अनियंत्रित ट्रेलरने बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले.

उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आणि रस्त्यावरून जाणारे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुमारे 15 ते 20 भाविकांना दुखापत झाली तर एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे कुरेभर सामुदायिक आरोग्य केंद्रात तातडीने नेण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश
सर्व भाविक हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ तसेच पारोळा, एरंडोल, धुळे, भुसावळ तालुक्यातील रहिवासी होते. अयोध्या येथे भगवान रामलला दर्शन घेऊन प्रयागराज दर्शनासाठी बसने जात होते. कूरेभार चौकात पोहोचताच एक अनियंत्रित ट्रेलरने बसला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.

हे भाविक झाले जखमी
जखमींमध्ये सुरेखा दगडू पाटील (40), दगडू धुडकू पाटील (48), संगीता रवींद्र पाटील (50), रमाबाई भारत पाटील (वय 65), अर्चना सुधाकर पाटील (वय 42), सुमनबाई बुधा पाटील (वय 66), संजय प्रताप पाटील (वय 60), भारत दगडू पाटील (वय 70), नीता महेंद्र पाटील (वय 62) योजना पद्मसिंग पाटील (53) पद्मसिंह हरसिंग पाटील (58), कोकीळाबाई नाना पाटील वय (65), आशाबाई बाळू पाटील (वय 70), सुमित्रा भारत पाटील (वय 63),(केसीएन)साधना राजेंद्र पाटील (वय 48), इंदुबाई मधुकर पाटील (वय 68), शोभा दगडू पाटील (वय 54), साहेबराव शेनफळ पाटील (वय 66), आशाबाई साहेबराव पाटील (वय 61), रंजनाबाई विजय पाटील (वय 50, सर्व रा.कल्याणीहोळ ता. धरणगाव), आशाबाई चंद्रसिंग पाटील (वय 50), संगीता हरी पाटील (वय 45), सुमनबाई पाटील वयसाठ भारती पाटील (वय 60, सर्व रा. कन्हेरे ता पारोळा).

सुलबाई महेंद्र राजपूत (वय 44), अनिता सुनील पाटील (वय 40, राहणार बाबेर ता. धुळे), कल्पना रामसिंग पाटील (वय 55), रामसिंग दगडू पाटील (वय 64, दोन्ही रा. फुलपाट ता. धरणगाव) निशाबाई कैलास पाटील (वय 55), आशाबाई सुपर पाटील (वय 50 दोन्ही रा. रामेश्वर), संगीता ठाणसिंग पाटील (वय 50, रा. वडगाव ता. पाचोरा), मंगलबाई नाना पाटील (वय 45, रा.सारोळा ता.पाचोरा), दिपाली कैलास पाटील (वय 36, निमगाव ता. यावल), अरुणा भारत पाटील (वय 50) भारत पाटील (वय 57 दोन्ही रा. मोहाडी ता. पारोळा),(केसीएन)अलका चौधरी (वय 55 रा. पिंपळकोठा ता. एरंडोल), भारत लक्ष्मण पाटील (वय 56), अलकाबाई भारत पाटील (वय 60, दोन्ही रा.जवखेडा ता. एरंडोल), रत्नाताई पाटील (वय 52, रा.नाशिक), मंदाबाई सुखदेव पाटील (वय 60, रा.खडकी ता. एरंडोल) जनाबाई पाटील (वय 62 रा.पुणे), वंदना पाटील (वय 60 रा. वरणगाव) यांचा समावेश आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !