धुळे गुन्हे शाखेची एकाचवेळी अवैध गॅस रिफिंलिंग करणार्‍या सहा ठिकाणांवर छापेमारी


Dhule Crime Branch raids six places for illegal gas refilling at the same time धुळे (6 डिसेंबर 2025) : घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करणार्‍या सहा ठिकाणांवर शनिवार, 6 रोजी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने एकाचवेळी छापेमारी केल्याने अवैधरित्या गॅस भरणार्‍यांचे धाबे दणाणले. या कारवाई 25 हजार 400 रुपये किंमतीचे एकूण 7 गॅस सिलेंडर व गॅस भरण्याचे साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले. धुळे शहर, आझादनगर, देवपूर, चाळीसगावरोड व मोहाडीनगर पोलिस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

एकाचवेळी छापेमारी
धुळ्यातील देवपूर पोलिस ठाणे हद्दीतील चंदन नगर, मोचीवाडा येथील सार्वजनिक शौचालयाजवळ प्रदीप रुपचंद सूर्यवंशी (48, रा.विष्णूनगर, मोचीवाडा, देवपूर धुळे) याच्याकडून घरगुती गॅस सिलेंडरचा
बेकायदेशीर साठा व गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, एपीआय नामदेव सहारे, फौजदार अमित माळी, अंमलदार संतोष हिरे, सदेसिंग चव्हाण, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, शशिकांत देवरे, तुषार सुर्यवंशी, मायुस सोनवणे, चेतन बोरसे, सुशील शेंडे, हर्षल चौधरी, जगदीश सुर्यवंशी, विनायक खैरनार, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !