उतारावरुन ट्रॅक्टर विहिरीत कोसळले : दोघे मुलीही पाण्यात बेपत्ता


Tractor falls into well from a slope : Both girls drown साक्री (7 डिसेंबर 2025)  शेतात कामासाठी आणलेले ट्रॅक्टर उतारावरून थेट 50 फूट खोल विहिरीत कोसळले. दुर्देवाने या ट्रॅक्टरवर दोन चिमुकल्या मुली बसल्या असल्याने त्यादेखील पाण्यात बुडाल्या. ही दुर्दैवी घटना धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गणेशपूर गावाजवळ रविवारी दुपारी घडली. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता मुलींचा शोध सुरू होता.

काय घडले नेमके ?
गणेशपूर गावात रविवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मराठे यांच्या शेतात कांदा भरण्यासाठी आणलेले ट्रॅक्टर उतारावरुन थेट सुमारे 50 फूट खोल विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन मुलीही विहिरीत बुडून बेपत्ता झाल्या.

ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
गावकर्‍यांच्या मदतीने तातडीने क्रेन बोलावण्यात आली व ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर दोन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी सातत्याने शोधमोहीम सुरू आहे. अपघाताची बातमी पसरताच ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !