शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : एक कोटींचा गांजा जागीच जाळून केला नष्ट
Shirpur taluka police take major action : Ganja worth one crore destroyed by burning on the spot शिरपूर (8 डिसेंबर 2025) : शिरपूर तालुका पोलिसांनी प्रथमच तब्बल एक कोटी रुपयांची गांजा शेती जागेवरच जाळून नष्ट केली. शिरपूर तालुक्यात गांजा शेती फुलवण्यात आल्याची व जागेवर मुद्देमाल आणता येणे शक्य नसल्याने पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एनडीपीएस कायद्यातील कलम 52 ए च्या तरतुदीचा आधार धुळे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून पंचनाम्यानंतर गांजा शेती जागेवर नष्ट करण्याचे आदेश मिळवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
एका कोटींचा गांजा जागेवरच नष्ट
जामनेपाणी वनक्षेत्र कपार्टमें क्रमांक 1020 नियतक्षेत्र भोरखेडा येथील सुमारे 40 आर क्षेत्रात अर्थात् 40 हजार स्वेअर फुटात 42 लाख 45 हजार रुपये किंमतीचा गांजा जागेवरच नष्ट करण्यात आला.

तसेच नियतक्षेत्र बगळाज कपार्टमेंट क्रमांक 1041 येथील 37 गुंठे व 1042 येथील 45 गुंठे मिळून 82 क्षेत्रातील गांजा अज्ञातानी कारवाईच्या भीतीने कापून टाकला होता. 1276 किलो वजनाचा व एकूण 63 लाख 80 हजार रुपये किंमतीचा गांजादेखील पथकाने जाळून नष्ट केला. एक लाख 22 हजार स्वेअर फूट जागेतील अंदाजे दोन हजार 125 किलो गांजाची झाडे व एकूण एक कोटी सहा लाख 25 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, हवालदार सागर ठाकूर, हवालदार संतोष पाटील, हवालदार खसावद, विजय ढिवरे, स्वप्नील बांगर, मनोज नेरकर, जयेश मोरे, भूषण पाटील, प्रकाश भील, रोहिदास पावरा, पाला पुरोहित, भगवान गायकवाड, ग्यानसिंग पावरा, मुकेश पावरा, चालक अल्ताफ मिर्झा, ईसरार फारुकी, वनपाल बिपीन महाजन, बी.डी.कुंवर, वनपाल राजेंद्र पाटील, दीपिका पालवे, वनपाल कपिल पाटील आदींच्या पथकाने केली.

